मला सामावून जायचं आहे
नाकावरच्या रागात
लुप्त होऊन जायचं आहे
ओठावरच हसू तुझं
नेहमी सुरक्षित ठेवायचं आहे
तुझ्या निर्मळ मनातल्या
प्रत्येक भावनेत उतरायचं आहे
तुझ्या उबदार बाहुपाशात
स्वतःला विसरून जायचं आहे
पैंजनाच्या मधुर सुरांसोबत
आयुष्याची वाट चालायची आहे
~©स्पर्श~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.