तूच जिंकलास
अन् मला यात
कायमचं हरवलंस,
तुला हवं होतं
आता ते सर्व तुला मिळालं,
पण तू माझ्या प्रिय व्यक्तीला
स्वतःतून गमावलं,
आणि पुढे चालताना माझ्या
मनात प्रिय व्यक्ती सोबत असतील,
पण तुला कधीच उमजलं नाही
आणि आता काही बंध ही नसतील,
आता ना कटकट माझी
ना काळजीचे प्रश्न तुला,
कटूता नाही लागू देणार मी त्यांना
ज्या सुंदर आठवणी तू दिल्यात मला,
लागलीच कधी गरज माझी
तर हाक मार बिनधास्त तू,
पाळेल माझे दिलेलं वचन मी
संकटात तुझ्या नसशील फक्त तू,
तुला नाही आलं
तुझ्या शब्दांचा मान राखता
मी मात्र तुझं सुखचं मागेल
देवासमोर नेहमी हात जोडता...
~©स्पर्श~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.