तुझ्या चेहऱ्यावरचा राग
तुला आणखी सुंदर बनवतो,
गुलाबी झालेले गाल बघून
मग उगाच मी गाल ओढतो...
लटक्या रागाचा नाकावर टेंभा
मग हळूच विरून जातो गालावर
हास्याची खळी थोडी अन् थोडा
चढलेला राग पुन्हा येतो नाकावर...
आधीचा राग होताच त्यात आता
गाल ओढल्याचा रागाची बेरीज
मनवण्यास आता नुसते कान धरून
सुटका नाही, हसणार नाही तू चॉकलेट खेरीज...
~©स्पर्श~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.