काय दोष तिचा
या वासनाच्या
दुनियेमध्ये विश्वास
शोधला तर...
काय दोष तिचा
तिच्या स्वप्नासाठी
ती घराबाहेर
पडली तर...
काय दोष तिचा
जर ती रात्री
बेरात्री बाहेर
वावरली तर...
काय दोष तिचा
जर तिच्या आजूबाजूला
वासने चे राक्षस
आ वासून उभे आहेत तर...
काय दोष तिचा
नकार दिला जरी
अत्याचार सोसावे
लागले तर
काय दोष तिचा
या न्यायप्रविष्ठ
देशात ही न्याय
मिळत नसेल तर...
दिल्ली, काश्मिर,
कोपर्डी, हैदराबाद
आणखी किती
जीवांना मुकावं लागणार...
काय दोष तिचा
एक स्त्री म्हणून
जन्म घेतला तर...
मोकळा श्वास घेतला तर...
स्वप्न पाहिली तर...
~©स्पर्श~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.