MenuBar

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

चुकतंय कुठे?

तुझं चुकतंय
की माझं चुकलं
यात राहत ते एकमेकांना
समजून घ्यायचं... हे चुकतंय...

तू असं वागलास,
तू तसं नाही केलंस,
एकमेकांच्या चुका
दाखवत बसायचं... हे चुकतंय...

मी बरोबर आणि
तू कसा चुकीचा,
याचा पाढा गिरवत
एकमेकांना खुजवायचं... इथे चुकतंय...

तुझं-माझं करत बसतो
आणि आपलं दोघांचं काही असेल,
ते अलगद बाजूला सारून
तोंड फुगवून बसायचं... ते चुकतंय...

~©स्पर्श~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.