MenuBar

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

अश्रूंचे मोल...

तुझ्या नेत्रातून
ओघळणाऱ्या
त्या थेंबामुळे
मला उमगले

तुझं निरागस
चेहऱ्यावरचं
स्मितहास्य
गमावणे होते
अश्रूंचे मोल...

प्रत्येक अश्रुंच्या
ठायी तुला होणाऱ्या
वेतना अन् तुझं
छिन्विच्छिन
झालेलं मन होते
अश्रूंचे मोल...

तुझे अश्रू मज
मोत्याहूनही मौल्यवान...
तुझ्या कडातून
ओघळावा अन्
मी अलगद झेलून
हृदयात साठवावा...
~©स्पर्श~

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.