MenuBar

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधत होतो

रस्त्यावर खूप गर्दी जमली होती
अपघात झाला असं कानावर आलं,
पण घोळक्यामुळे पुढे जाता येत नव्हतं
थोडं पुढे जायचा प्रयत्न केला तर
मोबाईलवर फोटो काढणारे आणि व्हिडिओ शूट
करणारे हात उंचावलेले दिसले,
रुग्णवाहिका आली तर तिलाही
वाट द्यायला गर्दी बाजूला जात नव्हती
कशीबशी ती अपघात स्थळी गेली,
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह
बघ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला होता,
डॉक्टरने तिथेच नाडी तपासली
आणि गर्दीतून एकच नजर फिरवली,
दहा मिनिटांवर होता दवाखाना
आपल्यालाच यायला उशीर झाला...
त्या देहातून अर्धा तास रक्त वाहून
आत्मा ही कधीच देवलोकी गेला,
घरी आलो टीव्ही लावला तर
त्या अपघाताची बातमी आली
गर्दीत काढलेला व्हिडिओच दाखवला
मी मात्र त्या गर्दीतल्या माणसातला
संवेदनशील माणूस शोधत होतो...
आपण रुग्णवाहिका बोलावली नसती
तर आणखी कितीवेळ हा देखावा
चालला असता याची कल्पना केली...

1 टिप्पणी:

तुम्ही दिलेल्या अभिप्रायालाबद्दल आभारी आहे.

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.